Posts

Showing posts from August, 2020

लॉक डाउन मधली शाळा

Image
बाहेर पडणारा पाऊस व काळवटून आलेले ढग, वातावरणात असणारी नीरव शांतता, सर्वत्र जाणवणारी उदासीनता.. आणि अशा वातावरणात शाळेत एकटी असणारी मी.... याच एकटेपणात माझा व शाळेचा सुरू झालेला संवाद... नकळत दोघींच्या मध्ये आलेली एकरूपता..शाळेची मानसिकता समजून घेण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न मी कवितेच्या रूपाने मांडत आहे... सर्वच भावना शब्दात मांडता येत नाहीत... मनाची उद्विग्नता मांडताना शब्दही अपुरे पडतात.. रिकामं घर जसं खायला उठते तिच काहीशी अवस्था मला शाळेची जाणवली..

मैत्री चा दिवस

Image
आश्चर्य वाटलं का त्यात काय आश्चर्य वाटायच टायटल व चित्र यांचा खूप जवळचा संबंध आहे... कारण माझ्या सर्व मैत्रिणी कांद्या पोह्याना रिझर्व करतात.. माझ्या मैत्रिणी same या कांद्यापोह्या सारख्या आहेत. काही अश्याच सॉफ्ट पोह्यांच्या सारख्या. मनातून ,विचारातून व भावनाही अगदी मऊ.. कोणाच्याही सुख-दुःखात अगदी सहज सामील होतील अशा.. तर काही कांद्या सारख्या स्पष्ट बोलून डोळ्यात पाणी आणतील पण त्यांच्याशिवाय कांदे पोहे बिल्कुल अपूर्ण... काही मिरची सारखे तिखट, पण त्यांच्यामुळे जी वेगळीच चव येते ती मात्र अप्रतिम. काही हळदीसारखे  खूप गुणकारी आणि त्यांच्यामुळे जीवनाला जो रंग जडतो ना तो खूप टिकाऊ.. काही शेंगदाण्या सारख्या वरून कडक पण आतून अगदी मऊ,चविष्ट... काही खमंग शेव सारख्या त्यांच्याशिवाय सजावट पूर्णच नाही होऊ शकत. अजुन एक सिक्रेट सांगते कोणाला सांगू नका हं .. काहीजणी तर अशा असतात पांढरेशुभ्र खोबरे .कंदापोह्यवर  टाकले की कान्दापोह्याचा नखरा पाहण्यासारखा.. पण खर सांगू कितिही विदेशी डिश हॉटेल मध्ये खावुंन जी तृप्ती मिळत नाही ते अनमोल समाधान घरच्या पोह्यात आतोनात भरलेल असत . कारण त्यात...

जीवनाच्या परिक्षा

Image
10 वी चा निकाल,12 वी चा निकाल असो किव्हा अगदी 1-2 री चा..एक अप्रूप असत त्यामधे,एक वेगळीच गंमत म्हणा किव्हा ओढ..अगदी घरातल्या लहानापासुन मोठ्या ना सुद्धा..वर्षभर केलेल्या कष्टाच फळ किव्हा प्रयत्नांची पोचपावती.शिक्षकांचा विश्वास,आईवडिलांच्या स्वप्नांची पुर्तता.हे झाल शालांत परिक्षेच माझ मत.ज्या परिक्ष्याची तयारी करायला एक विशिष्ट वेळ दिलेली असते..त्याच ठराविक वेळेत त्या होतात. पालक,शिक्षक,विध्यार्थी सगळे योग्य नियोजन करुन परिक्षा ची तयारी जोमदार करतात.पास-नापास हा त्या पुढिल टप्पा.. पण आज आपण बोलणार आहोत ते जिवनाच्या परिक्ष्येबददल... जीवनाच्या परिक्ष्या या पावलापावलावर असतात. अचानक,अकल्पित,आनोख्या..कधी सोप्या तर कधी खूप भयंकर..कधी अगदी जीवघेण्या तर अगदी शुल्लक.ज्या भरभरुन दिलेल्या असतात आपल्या आजी आजोबानी,आई वडीलानी व आपल्या आसपासच्या सर्व मोठ्या माणसानी.. कधी गरिबीत,कधी आजारपणात,कधी संकटात तर कधी सहज अगदी काहीही कल्पना नसताना.. कस..बघा.आई-बाबा खूप काटकसर करुन खर्च भागवत असतात आणी अचानक कोणी तरी घरातली व्यक्ती आजारी पडते..आली परिक्षा..आता काय करायच,कोठून पैसे आणायचे,कोणाकडे म...