मैत्री चा दिवस
आश्चर्य वाटलं का त्यात काय आश्चर्य वाटायच टायटल व चित्र यांचा खूप जवळचा संबंध आहे... कारण माझ्या सर्व मैत्रिणी कांद्या पोह्याना रिझर्व करतात..
माझ्या मैत्रिणी same या कांद्यापोह्या सारख्या आहेत. काही अश्याच सॉफ्ट पोह्यांच्या सारख्या. मनातून ,विचारातून व भावनाही अगदी मऊ.. कोणाच्याही सुख-दुःखात अगदी सहज सामील होतील अशा.. तर काही कांद्या सारख्या स्पष्ट बोलून डोळ्यात पाणी आणतील पण त्यांच्याशिवाय कांदे पोहे बिल्कुल अपूर्ण... काही मिरची सारखे तिखट, पण त्यांच्यामुळे जी वेगळीच चव येते ती मात्र अप्रतिम.
काही हळदीसारखे खूप गुणकारी आणि त्यांच्यामुळे जीवनाला जो रंग जडतो ना तो खूप टिकाऊ.. काही शेंगदाण्या सारख्या वरून कडक पण आतून अगदी मऊ,चविष्ट... काही खमंग शेव सारख्या त्यांच्याशिवाय सजावट पूर्णच नाही होऊ शकत.
अजुन एक सिक्रेट सांगते कोणाला सांगू नका हं ..
काहीजणी तर अशा असतात पांढरेशुभ्र खोबरे .कंदापोह्यवर टाकले की कान्दापोह्याचा नखरा पाहण्यासारखा..
पण खर सांगू कितिही विदेशी डिश हॉटेल मध्ये खावुंन जी तृप्ती मिळत नाही ते अनमोल समाधान घरच्या पोह्यात आतोनात भरलेल असत . कारण त्यात पौष्टिकता भरपुर असते..तिच जिवनाची तृप्ती या मैत्रीच्या नात्यात असते..
मैत्रिणी शिवाय जीवन अगदीच बेचव आहे...कारण जगातील सर्व नात्याच्या तुलनेत मैत्रिणी निस्वार्थी असतात..
मैत्री म्हणजे श्रावणधारा...
खळखळून वाहनारा मंजूळ झरा..
इन्द्रधनुश्याची रंग बेरंगी कमान...
जीवनाला मिळालेले हिरवगार समृद्धिचे वरदान...
Happy friendship day to all my dear friend
-रेखा धावले
Khup chhan lihites Rekha
ReplyDeleteमांडणी खूप छान रेखा
ReplyDelete