जीवनाच्या परिक्षा

10 वी चा निकाल,12 वी चा निकाल असो किव्हा अगदी 1-2 री चा..एक अप्रूप असत त्यामधे,एक वेगळीच गंमत म्हणा किव्हा ओढ..अगदी घरातल्या लहानापासुन मोठ्या ना सुद्धा..वर्षभर केलेल्या कष्टाच फळ किव्हा प्रयत्नांची पोचपावती.शिक्षकांचा विश्वास,आईवडिलांच्या स्वप्नांची पुर्तता.हे झाल शालांत परिक्षेच माझ मत.ज्या परिक्ष्याची तयारी करायला एक विशिष्ट वेळ दिलेली असते..त्याच ठराविक वेळेत त्या होतात. पालक,शिक्षक,विध्यार्थी सगळे योग्य नियोजन करुन परिक्षा ची तयारी जोमदार करतात.पास-नापास हा त्या पुढिल टप्पा..
पण आज आपण बोलणार आहोत ते जिवनाच्या परिक्ष्येबददल...
जीवनाच्या परिक्ष्या या पावलापावलावर असतात.
अचानक,अकल्पित,आनोख्या..कधी सोप्या तर कधी खूप भयंकर..कधी अगदी जीवघेण्या तर अगदी शुल्लक.ज्या भरभरुन दिलेल्या असतात आपल्या आजी आजोबानी,आई वडीलानी व आपल्या आसपासच्या सर्व मोठ्या माणसानी..
कधी गरिबीत,कधी आजारपणात,कधी संकटात तर कधी सहज अगदी काहीही कल्पना नसताना..
कस..बघा.आई-बाबा खूप काटकसर करुन खर्च भागवत असतात आणी अचानक कोणी तरी घरातली व्यक्ती आजारी पडते..आली परिक्षा..आता काय करायच,कोठून पैसे आणायचे,कोणाकडे मागायचे,घेतले तरी परत कसे द्यायचे.पैसे नाहीत म्हणून आजारी माणसाला डॉक्टरकडे नेने टाळता येत नाही..मग सूरू होते कसोटी..म्हणजेच अचानक परिक्षा..
कोणाचे तरी बाबा अचानक काही कामासाठी गाडी घेवुन बाहेर पडतात..दुर्दव म्हणू अपघात होतो..किती भयंकर परिक्षा.कोणतच वेळापत्रक नाही,तयारी नाही..कस लागतो सर्व क्षमतांचा..हजारो प्रश्न असतात आई समोर..आर्थिक,सामाजिक,भावनिक,मानसिक सर्व विषयांचे पेपर समोर तेही खूप कठिण..ज्याचा अभ्यास कोणत्याच पुस्तकात नसतो..तिथे स्वत:लाच शिक्षक,स्वत:च विध्यार्थी,मार्गदर्शक व्हावे लागते..वेळच नसतो विचार करायला.समोर असते कुटुंबाचे,मुलाचे भविष्य...
सर्वात कठिण परिक्षा देत असतो शेतकरी..पाऊस पडेल की नाही माहित नसते पण शेत नागरने,कुरपने व बियाणे पेरणे सर्व तयारी करुन आभाळाकडे डोळे लावून बसनारा शेतकरी पाऊस पडला नाही की तिच बन्जर जमीन अश्रुंनी शिंपणे सोपी परिक्षा नसते मित्रानो..
ज्याना परिक्ष्याची खूप भिती वाटते त्यानी आई पण  अनुभवाव..कारण आई सारख्या भयंकर परिक्षा जगात कोणाला नसतात..लग्न,नवरा,सासर,माहेर,माण-सन्मान,सण वार,गर्भारपण,बाळंतपण,लहानपणापासुन ते मुलाना मोठ करेपर्यंत हजारो जीवघेण्या परिक्षा..ज्याना कोणताच अभ्यास्क्रम नाही,वेळापत्रक नाही..एक अनुभव सोबत घेवुन पुर्ण जीवनभर हजारो परिक्षा देवून नुसत भागत नाही तर गुणवत्ता ही लागते..
हा सर्व पसारा न संपणारा..डोळे उघडे ठेवून आजुबाजुला घडणारे प्रसंग,घटना परिक्ष्या काय असतात ते कळून समजते.
मह्णुन परिक्ष्याना न घाबरता सामना करा..कडवी झुंज जरुरी आहे..हरलो तर पुन्हा देवू परिक्षा..पुन्हा जिंकू..गरज आहे जगण्याची..
जान हैं तो लाखो पायेगे..मरकर सब खोने से अच्छा है,डटकर लढेगे हर मुश्किल से..कहेगे मुश्किलोंसे कितना भी बर्सो हम बहनेवालो मे से नही तो तुफानो मे कारवा बनाने वालो मे से है|
Love you jindagi again and again.
रेखा धावले

Comments

Post a Comment